'समरेणू'तील सम्या आणि रेणू प्रेक्षकांसमोर आल्यानंतर आता सिनेमातील खलनायक संत्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नुकतेच 'संत्या' या व्यक्तिरेखेच्या पोस्टरचे अनावरण राजकारणातील लोकप्रिय नेते अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. संत्या ही व्यक्तिरेखा भरत लिमण साकारत असून तो प्रत्यक्षातही पैलवान आहे. महेश डोंगरे दिग्दर्शित 'समरेणू' या चित्रपटात महेश डोंगरे, रुचिता मांगडे यांच्या प्रमुख भूमिका असून १३ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.